Posts

टुमदार गाव

  टुमदार गाव डोंगराच्या कुशीत लपलय छोटंसं माझं टुमदार गाव गाड्यांची नाही इथे रांग इमारतींना नाहीच वाव माणस प्रेमळ..मने निर्मळ प्रातःकाळी विठोबाचा गजर सडा रांगोळी अंगण सजवे वासुदेव राही दारात हजर बायांची लगबग न्याहारीची शेतावर जायला बैलगाडी पोरसोर शाळेला जाती आजीला शोभे नऊवारी साडी ज्याची त्याची गडबड न्यारी सारा दिवस शेतात जाई कामाची इथे नसते कमी तिन्ही सांजेला घरची घाई भाजी भाकर मिरचीचा ठेचा  शेतकरी राजा पोटभर जेवला हसला खेळला गाव सारा दमला डोंगराच्या कुशीत गुडूप निजला *© स्वाती शेळके- शेठ*

करोना

करोना करोना हा साधा नाही महामारी जगतात घराबाहेर पडायला नाही रे बळ अंगात...१ भर उन्हाळ्यात झाला साऱ्या जगात काळोख नाही दाखवली साधी नातलगांनी ओळख...२ हातावर पोट ज्यांचे हाल बहु त्यांचे झाले एका एका घासासाठी डोळे तरसू लागले...३ आठवा मागचे वर्ष काटा येई अंगावर कित्येकांचे गेले प्राण करोनाचा तो कहर...४ टाळ्या थाळ्या वाजवल्या धूप दीप ही लावले करोनाच्या बातम्यांनी जनजीवन विस्कटले...५ करशील तू प्रगती लावशील खूप शोध करोनामुळे का होईना घे माणुसकीचा बोध.....६ मास्क लावा हात धुवा सहा फूट अंतर ठेवा हॉटेलं सारी विसरा घरीच बनवून जेवा....७ डॉक्टर नर्स सेवक साऱ्यांनीच शर्थ केली तरी अनेक रूपांनी महामारी ती नटली...८ करोनाच्या नावाखाली हात साऱ्यांनी धुतले बिलांच्या गंगाजळीत दवाखान्याचे घोडे न्हाले....९ व्यर्थ नको करू थाट नको होऊ तू उन्मत्त माणसं तुझी मौल्यवान तू ठेव त्यांची किंमत.....१० © स्वाती शेळके - शेठ

आजी

पूर्वी आताच्यासारखे प्रत्येकाच्या हातात फोन आणि कॅमेरे नसायचे... गावं शहर खूप दूर असायची...कारण आत्तासारखी दळणवळणाची साधनं समृद्ध न्हवती की प्रत्येकाच्या दारात गाड्यांची रांग न्हवती.. वर्षाकाठी एखाद दोनदाच भेट व्हायची दूरच्या नातेवाईकांची आणि त्यामुळे विलक्षण ओढ असायची भेटीची... अशा साधारण २०-३० वर्षापूर्वीच्या काळातली ही गोष्ट आहे...  आजी.... दरवर्षी उन्हाळ्यात आजी वाट पाहायची आपल्या लाडक्या नातवंडांची. थोरली लेक मुंबईला आणि धाकटी पुण्याला.. दरवर्षी नातवंडं आणि पोरी उन्हाळ्याच्या सुट्टीत न चुकता महिनाभर गावी यायच्याच यायच्या... तेवढाच आराम आणि हक्काची सुट्टी.. लेकी आणि नातवंडं हीच काय ती आजीची संपत्ती.. लेकीबाळी आल्या की आजीच घर हे गोकुळच होऊन जायचं. उन्हाळ्यात सुद्धा दिवाळीच वाटायची तिला.. कुरडया, पापड्या, तिखट, मसाले करायची.. बोटवे.. म्हणजेच शेवया तर हातानेच वळायची.. काय तर म्हणे नातवंडांसाठी! बराच उरक होता म्हातारीला. सकाळी लवकरच उठवायची पोरांना... शेतावर न्यायची.. झाडावरचे आंबे, कैऱ्या काढायला लावायची.. मामासोबत विहिरीत पोहायला पाठवायची..आणि मगच न्याहारी द्यायची.. न्याहारी तरी काय

सावध हरिणी सावध ग…

खूप वर्षांपासून ही कथा मनात घोळत होती... आज finally कागदावर उतरवलीच.. कथा लिहून झाल्यावर शीर्षक मात्र सुचेना... तेव्हा या गाण्याची आठवण आली.. प्रत्येक व्यक्तीने जर थोडासा सजगपणा अंगी बाणवला तर आपण थोड्याफार प्रमाणात का होईना काही अपघात किंवा संकट टाळू शकतो... अर्थात हे माझं मत आहे...  नक्की वाचा... मी तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहत आहे... सावध हरिणी सावध ग… सहा महिन्याची maternity leave संपून महिन्याभरापूर्वी सुकन्याने office join kel होत.. एवढ्याशा चिमुरड्याला सांभाळायला एक मावशी तिने लावली होती. अगदी मनात नसतानासुद्धा तिला नोकरी करणं भागच होत.. दोन वर्षापूर्वी घेतलेलं स्वतःच घर .. चिमुकल्याच्या स्वागतासाठी घेतलेली चार चाकी.त्याचे हप्ते...नव्या पाहुण्याचे लाड.. औषधपाणी… बाकीचे घरातले खर्च एकट्या रोहन च्या पगारात कसे भागणार होते ना? म्हणूनच सुकन्या सुट्टी न वाढवता कामावर रुजू झाली. जीव अगदी पिळवटून निघायचा चिमुकल्या रूद्र ला मावशिंकडे सोपवताना..घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह केल्यामुळे ना सासरचा आधार ना माहेरचा… रोहन आणि सुकन्या दोघांनाही वाटलं होतं बाळाला पाहायला तरी य

झोका...

 झोका.. उंच माझा झोका की उंच तुझा झोका.. नकोच ती शर्यत मजला मी जपते माझाच ठेका खुणावतील मलाही क्षितिजे पूर्ण करण्या मनीची स्वप्ने तेव्हा घेईन मी झोका नव्या उमेदीने उंचच उंच कधी कोवळ्या उन्हात कसल्यातरी विचारात मी माझ्याच मुक्तछंदात रमेल या झोक्यात कधी गुलाबी थंडीत मस्त चहाच्या कपात आठवणींच्या वादळात मी माझ्याच झोकात.. © स्वाती शेळके-शेठ

आठवण...

 खूप खूप वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ब्लॉग' वर लिहायला चालू करतीये.. मधल्या काळात ब्लॉग वर ऍक्टिव्ह नसले तरी वह्यांमध्ये लिहीण  चालूच होते.. हि कविता खूप आधी लिहिलेली आहे.. १२/०३/२००६ रोजी लिहिलेली..  आठवण ...  माझ्या मनातल्या कप्प्यात  साठवलीये तुझी आठवण  तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण..  आता तू नाहीस या इथे..   पण तरीही तुझ्या पाउणखुणा  आहेत त्या वाटेवर..  तिथल्या मातीत एकरूप..  झालीये आपली आठवण..  तू अजूनही आहेस माझ्याचजवळ..  ओळखीचीच झाली होती तिथली पानं- फुलं  वळवाच्या पावसानं भिजलं सारं अंग  पण प्रेमानं ओली झाली ती आपली मनं..  हवे होते मला.. तुझ्या माझ्यात  त्या इंद्रधनुचे रंग..  गुलाबी थंडीत अंकुरले आपली मनं..  तिथंच आकारल आपल्या प्रेमाचं रोपटं..  तळपत्या उन्हातही बहराला आपल्या प्रेमाचा वृक्ष..  त्या वाटेवर अजूनही.. घुमतंय तुझं हसणं..  जाणवतंय मला तुझं हळुवार बोलणं ..  येत गहिवरून जेव्हा येते तुझी आठवण..  कारण.. आता एकाकी मी त्याच वाटेवर..  हसतोय माझ्यावर तिथल्या  वातावरणातला कण  न  कण..  कारण माहितीये ना त्याला..  जगणार आहे तुझी शिकवण..  जपणार आहे तुझीच आठवण..  तू नाहीस या

Out dated झालंय आयुष्य

ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली . कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला.   Out dated झालंय आयुष्य स्वप्नही download होत नाही संवेदनांना 'virus' लागलाय दु:खं send करता येत नाही जुने पावसाळे उडून गेलेत delete झालेल्या file सारखे अन घर आता शांत असतं range नसलेया mobile सारखे hang झालेय PC सारखी मातीची स्थिती वाईट जाती माती जोडणारी कुठेच नाही website एकविसाव्या शतकातली पीढी भलतीच 'cute' contact list वाढत गेली संवाद झाले mute computer च्या chip सारखा माणूस मनानं खुजा झालाय अन 'mother' नावाचा board, त्याच्या आयुष्यातून वजा झालाय floppy Disk Drive मध्ये आता संस्कारांनाच जागा नाही अन फाटली मनं सांधणारा internet वर धागा नाही विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक रक्ताच्या नात्यांनाही आता लागते facebook................