सावध हरिणी सावध ग…

खूप वर्षांपासून ही कथा मनात घोळत होती... आज finally कागदावर उतरवलीच.. कथा लिहून झाल्यावर शीर्षक मात्र सुचेना... तेव्हा या गाण्याची आठवण आली.. प्रत्येक व्यक्तीने जर थोडासा सजगपणा अंगी बाणवला तर आपण थोड्याफार प्रमाणात का होईना काही अपघात किंवा संकट टाळू शकतो... अर्थात हे माझं मत आहे... 

नक्की वाचा... मी तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहत आहे...

सावध हरिणी सावध ग…


सहा महिन्याची maternity leave संपून महिन्याभरापूर्वी सुकन्याने office join kel होत.. एवढ्याशा चिमुरड्याला सांभाळायला एक मावशी तिने लावली होती. अगदी मनात नसतानासुद्धा तिला नोकरी करणं भागच होत.. दोन वर्षापूर्वी घेतलेलं स्वतःच घर .. चिमुकल्याच्या स्वागतासाठी घेतलेली चार चाकी.त्याचे हप्ते...नव्या पाहुण्याचे लाड.. औषधपाणी… बाकीचे घरातले खर्च एकट्या रोहन च्या पगारात कसे भागणार होते ना? म्हणूनच सुकन्या सुट्टी न वाढवता कामावर रुजू झाली.

जीव अगदी पिळवटून निघायचा चिमुकल्या रूद्र ला मावशिंकडे सोपवताना..घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह केल्यामुळे ना सासरचा आधार ना माहेरचा… रोहन आणि सुकन्या दोघांनाही वाटलं होतं बाळाला पाहायला तरी येतील दोन्हीकडचे आजी आजोबा..पण तस काही झालं नाही…

रोज सकाळी ८:३० वाजता मावशी यायच्या… रूद्रला त्यांच्याकडे सोपवून सुकन्या आणि रोहन ९ वाजता ऑफिसला जायला निघायचे… आणि रात्री ८ वाजता दोघे घरी परतायचे...दिवसभर रूद्र बिचारा… मावशिंजवळच असतो याची खंत दोघांनाही होती.. आणि म्हणूनच शनिवार रविवार दोघेही फक्त रूद्र जवळच असत.सुकन्याची अगदी खास जीवाला जीव लावणारी मैत्रीण रेवती समोरच्याच फ्लॅट मध्ये राहत होती.. fashion designer रेवती घरूनच काम करायची...तिलाही सुकन्या ने बाळाला सांभाळायला मावशी लावल्याचे सांगितले होते…

रेवती ची खिडकी आणि सुकन्या ची खिडकी अगदी समोरासमोर असल्याने ती बरेचदा बाळाला खिडकीतून टाटा.. करायची.. घरातली कामं आटोपली की रेवती मस्त चहा घ्यायची.. गाणी ऐकत ऐकत चहा झाला की मगच clients ची कामं हातात घ्यायची.. आज छान आवडीच गाणं ऐकत चहा घेत होती.. सावध हरिणी सावध ग… तेवढ्यात तिची नजर समोरच्या खिडकीत गेली..आणि मावशिंनी पडदा लावून घेतला.. असे तोंडावर पडदा लावलेला तिला जामच खटकल होत..पण ऊन येत असेल म्हणून घेतला असेल लावून...असा विचार करून तिने दुर्लक्ष केलं… आणि संध्याकाळी सुकन्याच्या आवडीच्या कोथिंबीर वड्या तिला द्यायला गेल्यावर सहजच विचारलं तुझ्या घरात ऊन येत का ग दुपारचं..तर सुकन्या म्हटली अग थोडाच वेळ असतं अगदी १५-२० मिनिट.. रेवतीला त्यांचं असं पडदा लावून घेणं खरतर खटकलच होते.. पण उगाच पराचा कावळा कशाला करायचा म्हणून काही ती बोलली नाही… 


दुसऱ्या दिवशी कालचच सावध हरिणी सावध ग... गाणं गुणगुणत जरा कामानिमित्त बाहेर पडली.. तेव्हा एक अनोळखी इसम तिला लिफ्ट मधून बाहेर पडताना दिसला… असेल कोणीतरी.. वॉचमन गेटवर entry करून घेऊन मगच आत सोडत असल्यामुळे तिला ती गोष्ट काही गैर नाही वाटली… पण नेमका मोबाईल घरातच विसरल्यामुळे तिला परत घरी यावच लागलं.. मोबाईल घेऊन ती निघतच होती तेवढ्यात रूद्र चा खूप जोरात रडण्याचा आवाज तिला आला… आणि दरवाजा उघडून बघेपर्यंत तो मगाचाच माणूस लिफ्ट मधून जाताना तिने पाहिलं...त्या माणसाचं अस येणं आणि रूद्र च रडणं तिला खूप विचित्र वाटलं मनात अनेक शंका येऊ लागल्या…

दुसऱ्या दिवशी मुद्दाम कालच्याच वेळी ती दरवाजात उभी राहून पिप होल मधून पाहू लागली… आणि तेवढ्यात तो कालचाच माणूस आला.. इकडे तिकडे पाहून त्याने फक्त टक केलं दारावर तेवढ्यात मावशींनी दार उघडून त्याला आत घेतलं.. आणि पुन्हा रूद्र जोरात रडायला लागला...हा प्रकार पाहून रेवती भयंकर घाबरली.. काय केलं असेल त्या माणसानं रुद्रला हा विचार तिला सतावू लागला..…रात्री सुकन्या आणि रोहन आल्यावर  तिने दोघांनाही घडलेला प्रकार सांगितला.. 

दोघांनीही दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतली.. आणि प्लॅन केला.. सकाळी नेहमीप्रमाणे दोघेही ९ वाजता बाहेर पडले पण ऑफिसला न जाताच लिफ्ट ने खाली जाऊन पुन्हा वर रेवतिकडे आले… बरोब्बर ११:३० वाजता तोच माणूस परत आला… पण बाळाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी त्याला आत जाऊ दिलं..रोहन ने सेक्युरीटीला फोन करुन लिफ्ट पाशी त्या माणसाला पकडायला सांगितलं..तेवढ्यात रुद्र जोरजोरात रडल्याच ऐकू आल आणि सुकन्या अगदी सशासारखी भेदरली… रेवतीने पटकन दार उघडलं आणि सुकान्याच्या घराची बेल वाजवली सुकन्या आणि रेवती दोघींना एकत्र पाहून मावशी घाबरल्या.. पटकन सुकन्या ने बाळाला घेतलं.. आणि चला मावशी खाली म्हणत रेवतिने मावशींना ओढतच बाहेर काढलं…

पोलिस आले..मावशींना आणि त्या माणसाला घेऊन गेले. रीतसर चौकशी झाली तेव्हा समजलं की हा माणूस गेले चार दिवस रोज येऊन रूद्र च रक्त काढून नेत होता...त्याचे रोज थोडे थोडे केस कापून नेत होता.. काळया जादुसाठी...… एका कुठल्याशा ढोंगी बुआ ने सांगितलं होते त्याला की 21 दिवस असे रक्त आणि केस आणलेस तर करोडपती होशील म्हणे.... ह्या माणसावर आधीपासूनच बरेच गुन्हे दाखल होते..

रोहन पोलिस चौकीत गेला होता.. त्याला आणि मावशींना शिक्षा व्हायलाच हवी.. त्याचीच तरतूद करायला…

एवढा वेळ गांगरून गेलेली सुकन्या हळूहळू वर्तमानात आली..रेवती आणि सुकन्या रूद्रला डॉक्टर कडे घेऊन गेल्या...तो व्यवस्थित असल्याची.. त्याला काही इजा न झाल्याची खातरजमा करून घेतली त्यांनी.. रोहन आणि सुकन्या ने रेवतीचे आभार मानले..तिच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उजेडात आले होते...सोसायटीमध्ये रेवतीच खूप कौतुक झालं...मैत्रिणीच्या सतर्कतेमुळे एक अट्टल गुन्हेगार गजाआड गेला होता... पेपरात बातमी सुद्धा छापून आली..   काळया जादुसाठी लहान मुलाचं रक्त आणि केस कापणाऱ्याला जेरबंद करण्यात आल्याची.… 

पेपर मधली बातमी वाचून दोन्हीकडचे आजी आजोबा तातडीने पुण्याला आले… शेवटी नातवंड म्हणजे काय..दुधावरची साय… प्रेमाचा पाझर तर फुटणारच ना.. 

चाणाक्ष रेवतीमुळे मोठे संकट टळले होते…. आता एक एक महिना आलटून पालटून दोन्ही आजी आजोबा नातवाच कोड कौतुक करण्यात त्याला सांभाळण्यात मग्न आहेत.. आणि रोहन सुकन्या सुद्धा निर्धास्त.. रेवतिला सुद्धा आता संध्याकाळच्या चहासाठी पार्टनर मिळाले… 

© स्वाती शेळके



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आजी

झोका...