Posts

Showing posts with the label Women's Day

AT Your Service sir !!

आज ८ मार्च  जागतिक महिला दिन. एक स्त्री, आई , बायको,बहिण,मुलगी,मैत्रीण, गुरु,सासू,सून, अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना हल्लीच्या स्त्री ने तिचं स्वत्व सुध्धा जपण्याचा अनोखा प्रयत्न करायला सुरुवात केलीये..आणि हल्लीची हुशार पुरुष मंडळी ते नकळत का होईना मान्य करतात..आणि साथ देखील देतात काहीजण :) पूर्वीच्या स्त्रीच आयुष्य हे तिच्या नवरयाभोवती, मुला-बाळांमध्ये गुरफटलेल असायचं..नऊवारी साडी नेसून स्वयंपाक करणे, पै-पाहुण्यांचा पाहुणचार करण, सासू सासर्यांची सेवा आणि मुला-बाळांची काळजी घेण हेच तिचं विश्व ! काळानुसार बदल होऊन नऊवारीची सहावारी झाली, पण जबाबदार्यांमध्ये काही फरक नाही पडला.. कोणतीही जबाबदारी तिने  कधी नाकारली नाही.... कधी कोमल, मृदू , सोज्वळ तर प्रसंगानुसार कठोर,कडक,शिस्तप्रिय ती होऊ  लागली .... हल्ली jeans,  trousers , shirt  घालणारी,  laptop , mobile  सहजपणे हाताळणारी, office  मध्ये मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या लीलया पार पाडणारी स्त्री पाहायला मिळते, पण, नोकरदार स्त्रियांनी सुद्धा त्यांची कोणतीच जबाबदारी टाळली नाहीये..... स...