आनंदामधलं 'ते एका पावलाचं' अंतर
साधीच गोष्ट/घटना आहे पण हल्ली हा "दृष्टीकोन" राहिला नाही म्हणून..... :-) बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. दारात शिवराम. शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो. 'साहेब, जरा काम होतं.' 'पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?' 'नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.' 'अरे व्वा ! या आत या.' आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता. मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी नको नको म्हणाला. आग्रह केला तेव्हा बसला. पण अवघडून. मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली. 'किती मार्क मिळाले मुलाला ?' 'बासट टक्के.' 'अरे वा !' त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं. हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खुष दिसत होता. 'साहेब मी जाम खुश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !' 'अच्छा, म्हणून पेढे वगैरे !' शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं ...