सावध हरिणी सावध ग…
खूप वर्षांपासून ही कथा मनात घोळत होती... आज finally कागदावर उतरवलीच.. कथा लिहून झाल्यावर शीर्षक मात्र सुचेना... तेव्हा या गाण्याची आठवण आली.. प्रत्येक व्यक्तीने जर थोडासा सजगपणा अंगी बाणवला तर आपण थोड्याफार प्रमाणात का होईना काही अपघात किंवा संकट टाळू शकतो... अर्थात हे माझं मत आहे... नक्की वाचा... मी तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहत आहे... सावध हरिणी सावध ग… सहा महिन्याची maternity leave संपून महिन्याभरापूर्वी सुकन्याने office join kel होत.. एवढ्याशा चिमुरड्याला सांभाळायला एक मावशी तिने लावली होती. अगदी मनात नसतानासुद्धा तिला नोकरी करणं भागच होत.. दोन वर्षापूर्वी घेतलेलं स्वतःच घर .. चिमुकल्याच्या स्वागतासाठी घेतलेली चार चाकी.त्याचे हप्ते...नव्या पाहुण्याचे लाड.. औषधपाणी… बाकीचे घरातले खर्च एकट्या रोहन च्या पगारात कसे भागणार होते ना? म्हणूनच सुकन्या सुट्टी न वाढवता कामावर रुजू झाली. जीव अगदी पिळवटून निघायचा चिमुकल्या रूद्र ला मावशिंकडे सोपवताना..घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह केल्यामुळे ना सासरचा आधार ना माहेरचा… रोहन आणि सुकन्या दोघांनाही वाटलं होतं बाळाला पाहायला त...