टुमदार गाव

 टुमदार गाव


डोंगराच्या कुशीत लपलय

छोटंसं माझं टुमदार गाव

गाड्यांची नाही इथे रांग

इमारतींना नाहीच वाव


माणस प्रेमळ..मने निर्मळ

प्रातःकाळी विठोबाचा गजर

सडा रांगोळी अंगण सजवे

वासुदेव राही दारात हजर


बायांची लगबग न्याहारीची

शेतावर जायला बैलगाडी

पोरसोर शाळेला जाती

आजीला शोभे नऊवारी साडी


ज्याची त्याची गडबड न्यारी

सारा दिवस शेतात जाई

कामाची इथे नसते कमी

तिन्ही सांजेला घरची घाई


भाजी भाकर मिरचीचा ठेचा 

शेतकरी राजा पोटभर जेवला

हसला खेळला गाव सारा दमला

डोंगराच्या कुशीत गुडूप निजला


*© स्वाती शेळके- शेठ*

Comments

Popular posts from this blog

सावध हरिणी सावध ग…

आजी

झोका...