करोना
करोना
करोना हा साधा नाही
महामारी जगतात
घराबाहेर पडायला
नाही रे बळ अंगात...१
भर उन्हाळ्यात झाला
साऱ्या जगात काळोख
नाही दाखवली साधी
नातलगांनी ओळख...२
हातावर पोट ज्यांचे
हाल बहु त्यांचे झाले
एका एका घासासाठी
डोळे तरसू लागले...३
आठवा मागचे वर्ष
काटा येई अंगावर
कित्येकांचे गेले प्राण
करोनाचा तो कहर...४
टाळ्या थाळ्या वाजवल्या
धूप दीप ही लावले
करोनाच्या बातम्यांनी
जनजीवन विस्कटले...५
करशील तू प्रगती
लावशील खूप शोध
करोनामुळे का होईना
घे माणुसकीचा बोध.....६
मास्क लावा हात धुवा
सहा फूट अंतर ठेवा
हॉटेलं सारी विसरा
घरीच बनवून जेवा....७
डॉक्टर नर्स सेवक
साऱ्यांनीच शर्थ केली
तरी अनेक रूपांनी
महामारी ती नटली...८
करोनाच्या नावाखाली
हात साऱ्यांनी धुतले
बिलांच्या गंगाजळीत
दवाखान्याचे घोडे न्हाले....९
व्यर्थ नको करू थाट
नको होऊ तू उन्मत्त
माणसं तुझी मौल्यवान
तू ठेव त्यांची किंमत.....१०
© स्वाती शेळके - शेठ
Comments
Post a Comment