झोका...
झोका..
उंच माझा झोका
की उंच तुझा झोका..
नकोच ती शर्यत मजला
मी जपते माझाच ठेका
खुणावतील मलाही क्षितिजे
पूर्ण करण्या मनीची स्वप्ने
तेव्हा घेईन मी झोका
नव्या उमेदीने उंचच उंच
कधी कोवळ्या उन्हात
कसल्यातरी विचारात
मी माझ्याच मुक्तछंदात
रमेल या झोक्यात
कधी गुलाबी थंडीत
मस्त चहाच्या कपात
आठवणींच्या वादळात
मी माझ्याच झोकात..
© स्वाती शेळके-शेठ
उच्च विचार आणि अप्रतिम कविता👌👌👌
ReplyDeleteThank you so much :)
Delete