Posts

Showing posts with the label मराठी कविता

Out dated झालंय आयुष्य

ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली . कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला.   Out dated झालंय आयुष्य स्वप्नही download होत नाही संवेदनांना 'virus' लागलाय दु:खं send करता येत नाही जुने पावसाळे उडून गेलेत delete झालेल्या file सारखे अन घर आता शांत असतं range नसलेया mobile सारखे hang झालेय PC सारखी मातीची स्थिती वाईट जाती माती जोडणारी कुठेच नाही website एकविसाव्या शतकातली पीढी भलतीच 'cute' contact list वाढत गेली संवाद झाले mute computer च्या chip सारखा माणूस मनानं खुजा झालाय अन 'mother' नावाचा board, त्याच्या आयुष्यातून वजा झालाय floppy Disk Drive मध्ये आता संस्कारांनाच जागा नाही अन फाटली मनं सांधणारा internet वर धागा नाही विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक रक्ताच्या नात्यांनाही आता लागते facebook................  

मित्रत्वाचा हात दे.

प्रत्येक नववधुच्या मनातली घाल-मेल ! अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का ? तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का ? कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे "साडी मस्त शोभतीये आज" मनमोकळी दाद दे आठवणीने सुवासाचा कळीवाला गजरा दे सुटीत एखाद्या, एकटीलाच आपणहून फिरायला ने खमंग कणीस खातानाचा आनंद मनात टिपून घे हॉटेलातील मेनू कधीतरी तिच्या चॉईसचा घेऊन दे आईस्क्रीमची आवड सोडून तिच्याबरोबर कॉफी घे मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे अशी काहीशी साथ दे ....मित्रत्वाचा हात दे.

ती एकदा आजीला म्हणाली.....

ती एकदा आजीला म्हणाली.... मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं? आपली माणसं सोडून तीनेच का परक घर आपलं मानायचं? तिच्याकडुनच का अपेक्षा जुनं अस्तित्व विसरायची तीच्यावरच का जबरदस्ती नवीन नाव वापरायची? आजी म्हणाली.... अगं वेडे हा तर सृष्टीचा नियम आहे नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून तो येतो का कधितरी तिच्याकडे आपली वाट मोडून तीच पाणी किती गोड तरीही ती सागराच्या खारट पाण्यात मिसळते आपलं अस्तित्व सोडून ती त्याचीच बनुन जाते एकदा सागरात विलीन झाल्यावर तीही सागरच तर होते पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच नतमस्तक होतात लोकं पापं धुवायला समुद्रात नाही  तर गंगेतच जातात लोकं ..........

मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..

मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात.. कुणी 'orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात.. प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात.. कारण सगळे विषय 'chat' वरच संपलेले असतात.. मग 'chat' वर भेटूच " याचं Promise होतं.. आणि संभाषणातून 'Sign out' के लं जातं. .. 'लाल' 'हिरव्या ' दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं... घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं.. 'Available' आणि 'Busy' मध्ये प्रत्येकाचा status घुटमळत राहतो... आपणहून add केलेल्या मित्रा पासून लपा यला 'Invisible'चा आडोसा घेतला जातो.. ताप आल्याच आजकाल आईच्या आधी 'Facebook' ला कळत.. औषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं.. मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची मैत्रीत गरजच का असावी? नात्यांना धरून ठेवायला 'Net'' ची जाळीच का असावी? कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं.. 'chat' ला गप्पानी आणि 'Smile' ना हस्यानी replace करावं.. शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हात...

अजून काय हव असत??

एकच चहा, तो पण कटिंग  एकच पिच्चर , तो पण Tax-Free एकच साद , ती पण भाकरीची  अजून काय हव असत मित्राकडून... एकच कटाक्ष, तो पण हळूच  एकच होकार, तो पण लाजून  एकच स्पर्श, तो पण ठरवून  अजून काय हव असत प्रियाकडून.. एकच भुताची गोष्ट, ती पण  रागवून एकच श्रीखंडाची गोळी, ती पण अर्धी अर्धी  तोडून एकच जोरदार धपाटा , तो पण शिवी हासडून  अजून काय हव असत आज्जीकडून.. एकच मायेची थाप, ती पण  कुरवाळून एकच गरम पोळी, ती पण तूप  लावून एकच आशीर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून अजून काय हव असत आई कडून.. एकच कठोर नकार ' स्वैराचाराला ', तो पण हृदयावर दगड  ठेऊन एकच उपदेश सडेतोड , तो पण घोगर्या आवाजातून  एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहून अजून काय हव असत वडिलांकडून... सगळ्यांनी खूप दिल, ते पण न  मागून स्वर्गच जणू मिळाला मला, तो पण न मरून, फाटकी हि ' झोळी ', ती पण वाहिली भरून अजून काय हव असत आयुष्याकडून??? मला खूप खूप आवडलेली मराठी कविता ..

आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही !!!!

कितीही सुंदर मुलगी दिसली तरीही , तिची स्तुती करून तिला  हरभऱ्याच्या झाडावर चढवायला  आम्हाला कधी जमलेच नाही ... म्हणून आम्हाला  प्रेम करायला   अजून जमलेच नाही.. कोणाच्या मागे शित्यामारात फिरणं आमच्या तत्वात कधी बसलेच नाही म्हणून आम्हाला  प्रेम करायला   अजून जमलेच नाही..    कोणी जर आवड्लीच तर स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला आम्हाला कधी जमलेच नाही म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही... दुसरयाचे विचार ऎकत असतांना आपले विचार  मांडण्याची  संधी आम्हाला कधी साधताच आली नाही म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही... कधी हिम्मत  करुन कोणाला जर विचारलेच  तर मी तुला त्या द्रुषटीनी कधी बघितलेच  नाही या व्यतिरिक्त  दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही... प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो हे गणित  आम्हाल कधी समजलेच नाही म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही... फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही बरयाच सुंदर  फुलां म...