अजून काय हव असत??
एकच चहा, तो पण कटिंग
एकच भुताची गोष्ट, ती पण रागवून
एकच श्रीखंडाची गोळी, ती पण अर्धी अर्धी तोडून
मला खूप खूप आवडलेली मराठी कविता ..
एकच पिच्चर , तो पण Tax-Free
एकच साद , ती पण भाकरीची
अजून काय हव असत मित्राकडून...
एकच कटाक्ष, तो पण हळूच
एकच होकार, तो पण लाजून
एकच स्पर्श, तो पण ठरवून
अजून काय हव असत प्रियाकडून..
एकच भुताची गोष्ट, ती पण रागवून
एकच श्रीखंडाची गोळी, ती पण अर्धी अर्धी तोडून
एकच जोरदार धपाटा , तो पण शिवी हासडून
अजून काय हव असत आज्जीकडून..
एकच मायेची थाप, ती पण कुरवाळून
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून
एकच आशीर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून
अजून काय हव असत आई कडून..
एकच कठोर नकार ' स्वैराचाराला ', तो पण हृदयावर दगड ठेऊन
एकच उपदेश सडेतोड , तो पण घोगर्या आवाजातून
एकच उपदेश सडेतोड , तो पण घोगर्या आवाजातून
एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहून
अजून काय हव असत वडिलांकडून...
सगळ्यांनी खूप दिल, ते पण न मागून
स्वर्गच जणू मिळाला मला, तो पण न मरून,
स्वर्गच जणू मिळाला मला, तो पण न मरून,
फाटकी हि ' झोळी ', ती पण वाहिली भरून
अजून काय हव असत आयुष्याकडून???
Comments
Post a Comment