AT Your Service sir !!


आज ८ मार्च  जागतिक महिला दिन.
एक स्त्री, आई , बायको,बहिण,मुलगी,मैत्रीण, गुरु,सासू,सून, अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना हल्लीच्या स्त्री ने तिचं स्वत्व सुध्धा जपण्याचा अनोखा प्रयत्न करायला सुरुवात केलीये..आणि हल्लीची हुशार पुरुष मंडळी ते नकळत का होईना मान्य करतात..आणि साथ देखील देतात काहीजण :)

पूर्वीच्या स्त्रीच आयुष्य हे तिच्या नवरयाभोवती, मुला-बाळांमध्ये गुरफटलेल असायचं..नऊवारी साडी नेसून स्वयंपाक करणे, पै-पाहुण्यांचा पाहुणचार करण, सासू सासर्यांची सेवा आणि मुला-बाळांची काळजी घेण हेच तिचं विश्व ! काळानुसार बदल होऊन नऊवारीची सहावारी झाली, पण जबाबदार्यांमध्ये काही फरक नाही पडला.. कोणतीही जबाबदारी तिने  कधी नाकारली नाही.... कधी कोमल, मृदू , सोज्वळ तर प्रसंगानुसार कठोर,कडक,शिस्तप्रिय ती होऊ  लागली ....

हल्ली jeans,  trousers , shirt  घालणारी,  laptop , mobile  सहजपणे हाताळणारी, office  मध्ये मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या लीलया पार पाडणारी स्त्री पाहायला मिळते, पण, नोकरदार स्त्रियांनी सुद्धा त्यांची कोणतीच जबाबदारी टाळली नाहीये..... सकाळी लवकर उठून  नवर्याचा स्वतःचा, मुलांचा डबा तयार करण, मुलाला पाळणा घरात सोडून मग   office मधली काम करण, deadlines , meetings , projects सांभाळून पुन्हा मुलांना पाळणा घरातून घरी घेऊन जाणं, स्वयंपाक करण, सासरच्या आणि माहेरच्या लोकांना संभाळण, नातीगोती जपून ठेवण.. वृद्धिंगत करण, एवढंच नाही तर सर्व सणवार साजरे करणं ,  हि सुद्धा तिचीच अलिखित जबाबदारी असते! आणि ती समर्थपणे हे सर्व करते!

कधी नवरा चिडलाच तर त्याच्या कला-कलाने घेण, मुलांचा फ़क़्त  अभ्यास घेण्यावर तिचा भर नसतो तर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी देखील ती प्रयत्न करत असते. त्यांना कमी मार्क्स पडले तर कठोर होऊन त्यांच्याकडून अभ्यास करवून घेण, आणि त्यांनी एखादी गोष्ट चांगली केली तर तोंडभरून कौतुक देखील ती करतेच! जेव्हा जेव्हा आपल्या कुटुंबियांना आपली गरज असते  तेव्हा-तेव्हा  At your Service Sir  म्हणत ती हजर असतेच !  जिथे प्रेमाने बोलायला हव तिथे ती प्रेमानेच बोलते , पण ज्या लोकांना नीट बोललेलं कळत नाही त्यांना दोन खडे बोल ऐकवायला सुद्धा ती मागेपुढे पाहत नाही....

Engineer, doctor , वकील, scientist , अशी  तिची  अनेक रुपं पाहायला मिळतात.. दर वेळी स्त्री तिच्या वेगवेगळ्या रुपात भेटत असते.... उदाहरण देण्याची गरजच नसावी..... आणि द्यायचीच झाली तर अगदी शिवबांना घडवणाऱ्या जीजामातांपासून  झाशीची राणी,  कल्पना चावला, सुनिता विल्यम्स, लता मंगेशकर, माधुरी दिक्षित  यादी वाढतच जाईल.. :)  स्त्री ने जिथे जिथे म्हणून पाय ठेवला तिथे तिने स्वतःचे असे एक स्थान निर्माण केलेच! अगदी आकाशाला गवसणी घालातानादेखील तिने त्याला सांगितलं असेल कि माझ्या इच्छा आकांक्षापुढे तू सुद्धा ठेंगणाच  आहेस!

 आपली भारतीय संस्कृती हि पुरुषप्रधान आहे, आणि त्यामुळे समाजात आजही मुलगी नको म्हणून गर्भपात केला जातो, पण त्याच वेळी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी ची पूजा मात्र  केली जाते. कितीही गैरप्रकार , अन्याय होत असले तरीसुद्धा स्त्रियांनी जिद्द सोडलेली नाही आणि इथेच त्यांच्यातले patience  दिसून येतात!  स्त्री मुळातच कोमल स्वभावाची, भरभरून प्रेम देणारी!
 तिच्यातल्या सर्जनशीलतेला, सहनशीलतेला ,सृजनशीलतेला,आत्मविश्वासाला मनापासून अभिवादन! Happy Women's Day !

~  स्वाती शेळके

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सावध हरिणी सावध ग…

आजी

झोका...