Posts

Showing posts from December, 2021

टुमदार गाव

  टुमदार गाव डोंगराच्या कुशीत लपलय छोटंसं माझं टुमदार गाव गाड्यांची नाही इथे रांग इमारतींना नाहीच वाव माणस प्रेमळ..मने निर्मळ प्रातःकाळी विठोबाचा गजर सडा रांगोळी अंगण सजवे वासुदेव राही दारात हजर बायांची लगबग न्याहारीची शेतावर जायला बैलगाडी पोरसोर शाळेला जाती आजीला शोभे नऊवारी साडी ज्याची त्याची गडबड न्यारी सारा दिवस शेतात जाई कामाची इथे नसते कमी तिन्ही सांजेला घरची घाई भाजी भाकर मिरचीचा ठेचा  शेतकरी राजा पोटभर जेवला हसला खेळला गाव सारा दमला डोंगराच्या कुशीत गुडूप निजला *© स्वाती शेळके- शेठ*

करोना

करोना करोना हा साधा नाही महामारी जगतात घराबाहेर पडायला नाही रे बळ अंगात...१ भर उन्हाळ्यात झाला साऱ्या जगात काळोख नाही दाखवली साधी नातलगांनी ओळख...२ हातावर पोट ज्यांचे हाल बहु त्यांचे झाले एका एका घासासाठी डोळे तरसू लागले...३ आठवा मागचे वर्ष काटा येई अंगावर कित्येकांचे गेले प्राण करोनाचा तो कहर...४ टाळ्या थाळ्या वाजवल्या धूप दीप ही लावले करोनाच्या बातम्यांनी जनजीवन विस्कटले...५ करशील तू प्रगती लावशील खूप शोध करोनामुळे का होईना घे माणुसकीचा बोध.....६ मास्क लावा हात धुवा सहा फूट अंतर ठेवा हॉटेलं सारी विसरा घरीच बनवून जेवा....७ डॉक्टर नर्स सेवक साऱ्यांनीच शर्थ केली तरी अनेक रूपांनी महामारी ती नटली...८ करोनाच्या नावाखाली हात साऱ्यांनी धुतले बिलांच्या गंगाजळीत दवाखान्याचे घोडे न्हाले....९ व्यर्थ नको करू थाट नको होऊ तू उन्मत्त माणसं तुझी मौल्यवान तू ठेव त्यांची किंमत.....१० © स्वाती शेळके - शेठ