Posts

Showing posts from November, 2020

आठवण...

 खूप खूप वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ब्लॉग' वर लिहायला चालू करतीये.. मधल्या काळात ब्लॉग वर ऍक्टिव्ह नसले तरी वह्यांमध्ये लिहीण  चालूच होते.. हि कविता खूप आधी लिहिलेली आहे.. १२/०३/२००६ रोजी लिहिलेली..  आठवण ...  माझ्या मनातल्या कप्प्यात  साठवलीये तुझी आठवण  तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण..  आता तू नाहीस या इथे..   पण तरीही तुझ्या पाउणखुणा  आहेत त्या वाटेवर..  तिथल्या मातीत एकरूप..  झालीये आपली आठवण..  तू अजूनही आहेस माझ्याचजवळ..  ओळखीचीच झाली होती तिथली पानं- फुलं  वळवाच्या पावसानं भिजलं सारं अंग  पण प्रेमानं ओली झाली ती आपली मनं..  हवे होते मला.. तुझ्या माझ्यात  त्या इंद्रधनुचे रंग..  गुलाबी थंडीत अंकुरले आपली मनं..  तिथंच आकारल आपल्या प्रेमाचं रोपटं..  तळपत्या उन्हातही बहराला आपल्या प्रेमाचा वृक्ष..  त्या वाटेवर अजूनही.. घुमतंय तुझं हसणं..  जाणवतंय मला तुझं हळुवार बोलणं ..  येत गहिवरून जेव्हा येते तुझी आठवण..  कारण.. आता एकाकी मी त्याच वाटेवर..  हसतोय माझ्...