Posts

Showing posts from August, 2021

आजी

पूर्वी आताच्यासारखे प्रत्येकाच्या हातात फोन आणि कॅमेरे नसायचे... गावं शहर खूप दूर असायची...कारण आत्तासारखी दळणवळणाची साधनं समृद्ध न्हवती की प्रत्येकाच्या दारात गाड्यांची रांग न्हवती.. वर्षाकाठी एखाद दोनदाच भेट व्हायची दूरच्या नातेवाईकांची आणि त्यामुळे विलक्षण ओढ असायची भेटीची... अशा साधारण २०-३० वर्षापूर्वीच्या काळातली ही गोष्ट आहे...  आजी.... दरवर्षी उन्हाळ्यात आजी वाट पाहायची आपल्या लाडक्या नातवंडांची. थोरली लेक मुंबईला आणि धाकटी पुण्याला.. दरवर्षी नातवंडं आणि पोरी उन्हाळ्याच्या सुट्टीत न चुकता महिनाभर गावी यायच्याच यायच्या... तेवढाच आराम आणि हक्काची सुट्टी.. लेकी आणि नातवंडं हीच काय ती आजीची संपत्ती.. लेकीबाळी आल्या की आजीच घर हे गोकुळच होऊन जायचं. उन्हाळ्यात सुद्धा दिवाळीच वाटायची तिला.. कुरडया, पापड्या, तिखट, मसाले करायची.. बोटवे.. म्हणजेच शेवया तर हातानेच वळायची.. काय तर म्हणे नातवंडांसाठी! बराच उरक होता म्हातारीला. सकाळी लवकरच उठवायची पोरांना... शेतावर न्यायची.. झाडावरचे आंबे, कैऱ्या काढायला लावायची.. मामासोबत विहिरीत पोहायला पाठवायची..आणि मगच न्याहारी द्यायची.. न्याहारी तरी काय

सावध हरिणी सावध ग…

खूप वर्षांपासून ही कथा मनात घोळत होती... आज finally कागदावर उतरवलीच.. कथा लिहून झाल्यावर शीर्षक मात्र सुचेना... तेव्हा या गाण्याची आठवण आली.. प्रत्येक व्यक्तीने जर थोडासा सजगपणा अंगी बाणवला तर आपण थोड्याफार प्रमाणात का होईना काही अपघात किंवा संकट टाळू शकतो... अर्थात हे माझं मत आहे...  नक्की वाचा... मी तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहत आहे... सावध हरिणी सावध ग… सहा महिन्याची maternity leave संपून महिन्याभरापूर्वी सुकन्याने office join kel होत.. एवढ्याशा चिमुरड्याला सांभाळायला एक मावशी तिने लावली होती. अगदी मनात नसतानासुद्धा तिला नोकरी करणं भागच होत.. दोन वर्षापूर्वी घेतलेलं स्वतःच घर .. चिमुकल्याच्या स्वागतासाठी घेतलेली चार चाकी.त्याचे हप्ते...नव्या पाहुण्याचे लाड.. औषधपाणी… बाकीचे घरातले खर्च एकट्या रोहन च्या पगारात कसे भागणार होते ना? म्हणूनच सुकन्या सुट्टी न वाढवता कामावर रुजू झाली. जीव अगदी पिळवटून निघायचा चिमुकल्या रूद्र ला मावशिंकडे सोपवताना..घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह केल्यामुळे ना सासरचा आधार ना माहेरचा… रोहन आणि सुकन्या दोघांनाही वाटलं होतं बाळाला पाहायला तरी य

झोका...

 झोका.. उंच माझा झोका की उंच तुझा झोका.. नकोच ती शर्यत मजला मी जपते माझाच ठेका खुणावतील मलाही क्षितिजे पूर्ण करण्या मनीची स्वप्ने तेव्हा घेईन मी झोका नव्या उमेदीने उंचच उंच कधी कोवळ्या उन्हात कसल्यातरी विचारात मी माझ्याच मुक्तछंदात रमेल या झोक्यात कधी गुलाबी थंडीत मस्त चहाच्या कपात आठवणींच्या वादळात मी माझ्याच झोकात.. © स्वाती शेळके-शेठ