Posts

Showing posts from 2012

Out dated झालंय आयुष्य

ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली . कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला.   Out dated झालंय आयुष्य स्वप्नही download होत नाही संवेदनांना 'virus' लागलाय दु:खं send करता येत नाही जुने पावसाळे उडून गेलेत delete झालेल्या file सारखे अन घर आता शांत असतं range नसलेया mobile सारखे hang झालेय PC सारखी मातीची स्थिती वाईट जाती माती जोडणारी कुठेच नाही website एकविसाव्या शतकातली पीढी भलतीच 'cute' contact list वाढत गेली संवाद झाले mute computer च्या chip सारखा माणूस मनानं खुजा झालाय अन 'mother' नावाचा board, त्याच्या आयुष्यातून वजा झालाय floppy Disk Drive मध्ये आता संस्कारांनाच जागा नाही अन फाटली मनं सांधणारा internet वर धागा नाही विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक रक्ताच्या नात्यांनाही आता लागते facebook................  

AT Your Service sir !!

आज ८ मार्च  जागतिक महिला दिन. एक स्त्री, आई , बायको,बहिण,मुलगी,मैत्रीण, गुरु,सासू,सून, अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना हल्लीच्या स्त्री ने तिचं स्वत्व सुध्धा जपण्याचा अनोखा प्रयत्न करायला सुरुवात केलीये..आणि हल्लीची हुशार पुरुष मंडळी ते नकळत का होईना मान्य करतात..आणि साथ देखील देतात काहीजण :) पूर्वीच्या स्त्रीच आयुष्य हे तिच्या नवरयाभोवती, मुला-बाळांमध्ये गुरफटलेल असायचं..नऊवारी साडी नेसून स्वयंपाक करणे, पै-पाहुण्यांचा पाहुणचार करण, सासू सासर्यांची सेवा आणि मुला-बाळांची काळजी घेण हेच तिचं विश्व ! काळानुसार बदल होऊन नऊवारीची सहावारी झाली, पण जबाबदार्यांमध्ये काही फरक नाही पडला.. कोणतीही जबाबदारी तिने  कधी नाकारली नाही.... कधी कोमल, मृदू , सोज्वळ तर प्रसंगानुसार कठोर,कडक,शिस्तप्रिय ती होऊ  लागली .... हल्ली jeans,  trousers , shirt  घालणारी,  laptop , mobile  सहजपणे हाताळणारी, office  मध्ये मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या लीलया पार पाडणारी स्त्री पाहायला मिळते, पण, नोकरदार स्त्रियांनी सुद्धा त्यांची कोणतीच जबाबदारी टाळली नाहीये..... सकाळी लवकर उठून  नवर्याचा स्वतःचा, मुलां